World Sleep Day

‘ नशिबवान आहेस बाबा, नशिब लागते अशी झोप यायला ’ – एक मित्र दुस-याला
‘ हल्ली ना झोपच येत नाही हो , सकाळी दोन वाजताच उठून बसतो़ ’ – एक आजोबा त्याच्या ग्रुप मघ्ये
‘ किती दिवस झाले काय माहिती निवांत झोपून ’ – इति पोलीस ऑफिसर
‘ हल्ली ना खुप स्वप्न पडतात ग, पण यामुळे माझी झोपच नाही होत़ ’ – एक मैत्रिण दुसरीला
‘ हे खुप दात खातात हो झोपे मघ्ये , भीती वाटते शेजारी झोपण्याची़ ’ – नववधू डॉक्टराना
‘ अरे तुला माहिती आहे का, हा झोपे मघ्ये चक्क बोलतो ’ – एक होस्टेल मघ्ये रहणारा मुलगा
‘ डॉक्टर , माझी झोप ना एकदम माजंरीसारखी आहे , खुट झाले तरी जाग येते ’ – एक आजीबाई
‘ कुंभकर्णच आलाय बाई जन्माला माझया घरात ’ – एक त्राससलेली आई
‘ मला झोप येत नाही म्हणुन मी दारू सुरू केली ’ – एक पेशन्ट
‘ रात्रभर फुटबॉल पाहिले, झोप नाही झाली , गाडी चालवताना झोपला आणि होत्याचे नव्हते झाले़ ’ – सत्यघटना
‘ अरे काय तो शेजारच्या बर्थ वरचा माणुस विमानाचा आवाज कमी असेल असला घोरत होता ’ – एक झोप न झालेला सहप्रवासी
‘ ह्या रविवारी ना दिवसभर मस्त झोपणार आहे ’- एक डॉक्टर *©Muktesh Daund*

    आपण आपल्या आयुष्याच्या ३६ टक्के वेळ झोपेमध्ये घालवतो . म्हणजे ९० वर्षे जगलेला माणुस सरासरी ३२ वर्ष झोपलेला असतो . ६० टक्के पेक्षा जास्त आजारां मध्ये झोप न येणे हे प्रमुख लक्षण असते. अश्या या सगळ्यांच्या आवडीच्या आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे झोप रोज झोपतो तरी याविषयी शास्त्रीय माहिती खुपच कमी लोकांना आहे.

    खरंच आपण का झोपतो़ ? कधी आलाय असा विचार तुमच्या मनात ? झोप येणे , ती टिकून राहणे परत जाणे, तिचे कार्य , झोपे दरम्यान शरीरात होणारे बदल आणि आजारी असताना त्यात होणारे बदल , झोपेची औषधे , झोप न झाल्यास शरीरावर होणारा परिणाम , झोपेचे विविध आजार आणि त्यांचे योग्य ते नियोजन ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा शास्त्रज्ञ मात्र खुप प्रयत्न करत आहेत .

    झोपेतील सगळ्यात मोठा बदल हा विद्युत उपकरणांचा शोध लागल्यापासुन झालाय . कारण यामुळे नैसर्गिक दिवस आणि रात्र यामधील फरकच नाहीसा केलाय . एक बटन दाबले की रात्रीसुद्धा दिवसा इतकाच उजेड असतो . दुसरे झोपेचं महत्व कमी होण्याचे कारण म्हणजे आपण झोपे मध्ये काहीच करत नाही , यामुळे बऱ्याच जणांना झोपणे म्हणजे वेळेचा अपव्यय वाटतो . पण असा विचार करणे हे पूर्णतः चुकीचे आहे . आपले जिवन यशस् झोपेतील सगळ्यात मोठा बदल हा विद्युत उपकरणांचा शोध लागल्यापासुन झालाय . कारण यामुळे नैसर्गिक दिवस आणि रात्र यामधील फरकच नाहीसा केलाय . एक बटन दाबले की रात्रीसुद्धा दिवसा इतकाच उजेड असतो . दुसरे झोपेचं महत्व कमी होण्याचे कारण म्हणजे आपण झोपे मध्ये काहीच करत नाही , यामुळे बऱ्याच जणांना झोपणे म्हणजे वेळेचा अपव्यय वाटतो . पण असा विचार करणे हे पूर्णतः चुकीचे आहे . आपले जिवन यशस्वीपणे चालण्यामध्ये झोपेचा खुप मोठा वाटा आहे़ .वीपणे चालण्यामध्ये झोपेचा खुप मोठा वाटा आहे़ .

    झोप कशी येते , झोप येण्यासाठी मेंदूमध्ये एकच अशी जागा नाहीये , तर मेंदू मधील वेगवेगळ्या ठिकाणां मधील परस्पर संवादामुळे आपल्याला झोप येते . म्हणजेच आपली जी समजुत आहे की झोपेमध्ये आपला मेंदू झोपतो ही चुकीची आहे . खरे तर झोपेमध्ये मेंदूतील काही घटकांचे काम हे जागृत अवस्थे पेक्षा जास्त प्रमाणात चालु असते़

    आपण का झोपतो ? खुप वेगळ्या वेगळ्या संकल्पनां चा यामध्ये विचार करण्यात आलाय . नेमके कारण अजुन माहिती नाही . पाहिली संकल्पना म्हणजे शरीराला विश्रांती हवी म्हणून आपण झोपतो . दिवस भरात जे काही बदल शरीरात झालेले असतात ते झोपेनंतर पूर्ववत होतात . शरीरामध्ये वाढीचे काम याच वेळेस होते . याला सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे खुप सगळे जनुके , हार्मोन , प्रोटीन , चयापचयक्रियेतील घटक हे झोपे मध्ये जागृत होतात . त्यांचे काम करतात आणि जाग येण्याआधी निघून जातात़. दुसरे झोप येण्याचे कारण म्हणजे उर्जेचे जतन करणे . आपण जागे असताना भरपूर उर्जाही आपल्या शरीराचा मेंटेनन्स ठेवण्यात खर्च होते. ही उर्जा वाचवली जावी म्हणून आपण झोपतो असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे . पण सूक्ष्मपणे अभ्यास केल्यावर असे दिसते की झोपल्यानंतर आपण ११० कॅलरी एवढीच उर्जा वाचवतो . दोन कप चहा घेतल्यावर एवढी ताकद आपल्याला मिळून जाते . त्यामुळे हे कारण थोडे मागे पडते. *©Muktesh Daund*

    तिसरे आणि सगळ्यात महत्वाचे कारण आठवणीं चे जतन आणि दिवसभरात शिकलेल्या गोष्टींची योग्य वर्गवारी लावणे . त्यामुळे आपण सर्वांनी अनुभव घेतला असेल , जेव्हा आपली झोप व्यवस्थित झालेली नसते तेव्हा नवीन गोष्टी शिकण्याची आपली क्षमता खुपच खालावलेली असते. झोप ही फक्त दिवसभरात केलेल्या गोष्टी स्मरणात ठेवण्यासाठी महत्वाची नसुन , सगळ्यात चांगला फायदा म्हणजे अवघड प्रश्नांची उत्तरे आपल्याला छान झोपेनंतर मिळतात . बरेच शोध हे शास्त्रज्ञांना झोपेतुन उठल्यानंतर लागलेले आहेत . सर्वसाधारणपणे छान झोपे नंतर वैचारिक क्षमताही तिपटीने चांगली काम करते असे दिसून आले आहे . झोपेमध्ये मेंदू मध्ये खुप मोठ्या प्रमाणात बदल होत असतात . जे हवंय त्याचे जतन केले जाते आणि नकोश्या गोष्टी काढून टाकल्या जातात . (Synapses ,nerve connections)

    आतापर्यंत आपण झोपेचे जे काही फायदे पाहिले , त्यातुन एक गोष्ट तर नक्की आहे , झोप ही आपल्या आयुष्यातील खुप मोठी घटना आहे आणि आपण सगळ्यांनी तिला तिचे महत्व द्यायलाच पाहिजे . याउलट समजा जर कोणाचा निद्रानाश झाला असेल तर त्याला दैनदिन जीवनात भरपूर अडचणीचा सामना करावा लागतो . सध्याच्या काळातील सगळ्यात दुर्दैवी घटना म्हणजे आपली पिढी ही खुपच कमी झोप घेतेय . १९५० मध्ये साधारणपणे मनुष्य ८ तास झोपत होता . तेच प्रमाण २०१३ मध्ये ५ तासांवर आले आहे . साधारपणे आपण सर्व दररोज २ तास कमी झोपत आहोत . सगळ्यात जास्त तोटा हा शाळेत जाणाऱ्या मुलांचा आहे . त्यांना सलग ९ तास झोप हवी असते . पण अर्धवट झोपेतच उठवून त्यांना शाळेत बसवले जाते . याचा त्यांच्या एकाग्रते वर नक्कीच परिणाम होतो . उतार वयात देखील सलग झोपण्याची क्षमता कमी झालेली असते .

     कामाच्या शिफ्टमुळे सुद्धा झोपेवर प्रचंड परिणाम झालेला असतो . २० टक्के लोकांना झोपेचे आजार होतात . त्यांचे शरीरातील घड्याळ हे दिवसा काम करण्यासाठी बनलेले आहे . रात्र भर काम करून जेव्हा हे दुपारी झोपायचा प्रयत्न करतात , ते झोपूच शकत नाहीत . कारण त्यांचा मेंदू सांगत असतो , अरे अजुन दिवस आहे ही झोपायची वेळ नाही . प्रवासातील साधनां मध्ये झालेल्या प्रगतीमुळे जेटलॅग सारख्या गोष्टी घडतात. *©Muktesh Daund*

     या सर्वां वरती उपाय म्हणून आपला मेंदू थोड्या थोड्या वेळासाठी झोपून घेतो . यालाच आपण डुलकी येणे म्हणतो़ . कितीही प्रयत्न केला तरी आपण डुलकी टाळू शकत नाही . ३१ टक्के ड्रायवर हे त्यांच्या आयुष्यात गाडी चालवताना झोपतात आणि हे अपघाताचे खुप मोठे कारण आहे . आपल्या सगळ्यांना माहिती आहे , पहाटेच्या वेळेस जास्त अपघात होतात , याला हेच डुलकी येणे हे कारण आहे . ( एक डुलकी एक अपघात ). फक्त एवढेच नाहीतर मोठ्या मोठ्या कारखान्यां मध्ये होणाऱ्या अपघाता मध्ये सुद्धा कर्मचार्यांच्या चुका कारणीभूत असतात आणि याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे झोपेचा अभाव , ओवरटाइम , जास्त वेळेच्या शिफ्ट हेच असतात .

     यातुन हेच सिद्ध होते की झोपेच्या कमतरतेमुळे एकाग्रता कमी होते , चीडचीडेपणा वाढतो , वैचारिक ताकद कमी होते . ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे व्यसन आणि लठ्ठपणा यात देखील वाढ होते . बऱ्याच वेळा झोपेसाठी मग दारूची म दत घेतली जाते . पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या , दारू पिऊन गुंगी येते , झोप नाही आणि या गुंगीमुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आहे . कमी झोपेमुळे घेरलीन नावाचे हार्मोन रक्तामध्ये सोडले जाते . त्यामुळे साखर जास्त असणाऱ्या गोष्टी खाण्याकडे आपला कल वाढतो. थकलेल्या व्यक्तींमध्ये प्रचंड स्ट्रेस असतो हे देखील आपल्याला खाण्यासाठी उद्युक्त करतात आणि वजन वाढण्यासाठी हातभार लावतात . सततचा तणाव आणि त्याबरोबर जर कमी झोप असेल तर या गोष्टी आपली रोगप्रतिकारशक्ती कमी करतात . त्यामुळे ह्या लोकांमध्ये नेहमी आजार चालु असतात . संशोधनात हे पण आढळुन आले आहे की जे लोक शिफ्ट मध्ये काम करतात , त्यांना कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. स्ट्रेसमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तिला रेझिस्टन येतो आणि मधुमेहाचा आजार जडतो . स्ट्रेसमुळे हृदयाचे आजारसुद्धा वाढतात .

     ह्या सर्व गोष्टी कमी झोपेमुळे होतात . त्यामुळे झोपेला कमी लेखू नका . तर मग प्रश्न पडतो की कसे ओळखायच की आपण पुरेशी झोप घेतोय की नाही ? सोपं आहे. तुम्हांला झोपेतुन उठण्यासाठी अलार्म लावावा लागत असेल , बिछान्यातून उठण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागत असतील , चहा घ्यावा लागत असेल , चिडचिड होत असेल , तुमचे मित्र तुम्हांला विचारात असतील की काय आज झोपला नाहीस का ? थकलेला दिसतो आहेस . ही लक्षणे असतील तर तुम्ही नक्कीच गरजेपेक्षा कमी झोपत आहात .

तर मग छान झोपे साठी काय करायचे ?

    झोपेची ठराविक वेळ असावी . ती कटाक्षाने पाळावी . झोपेची जागा , बेडरूम शांत असावी . उजेड कमीत कमी असावा . झोपेला जाण्याच्या आधी १ तास तरी प्रखर लाइट टाळावी . मोबाईल , कॉम्पुटर दूर ठेवावे . अश्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या शरीराला उत्साहित करतील त्या दूर ठेवाव्यात . झोपेच्या आधी ४ तास तरी चहा , कॉफी , कोल्डड्रिंक , तंबाकू किंवा कुठलेही व्यसन टाळावे . दिवसा सूर्यप्रकाशात जरूर जावे. *©Muktesh Daund*

काही गैरसमज

    लहान मुले आळशी असतात़ . नाही . त्यांच्या मेंदूची वाढ होत असते त्यामुळे ते उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात . आपल्याला ८ तासांची झोप आवश्यकच असते असे नाहीये . व्यक्तीनुसार हे प्रमाण बदलू शकते . कोणाला जास्त झोपेची गरज असते कोणी कमी झोपेतही तेवढाच कार्यक्षम असतो . ज्याने त्याने आपल्या गरजेनुसार झोप घ्यावी . तुलना करू नये .

    वृध्द लोकांना कमी झोप येते . नाही . त्यांची झोप तुकड्यां मध्ये येते आणि तिची खोली कमी झालेली असते . लवकर झोपे… लवकर उठे , त्याला आरोग्य संपदा लाभे . याचा काहीही पुरावा आपल्याकडे नाही . व्यक्तीनुसार झोपेच्या वेळा बदलतात . उशिरा झोपून उशिरा उठ्नारे सुद्धा यशस्वी होतात .

     ह्यावर्षी दिनांक 15 मार्च रोजी १२ वा जागतिक झोप दिवस आहे . (World Sleep Day ) जागतिक निद्रा झोप दिवस हा २००७ पासुन दरवर्षी साजरा केला जाणारा दिवस आहे . झोपेचे महत्व आणि झोपेच्या आजारां विषयी जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी हा याचा महत्वाचा उद्देश आहे . यामध्ये प्रामुख्याने झोपेविषयी शास्त्रीय माहिती , झोपेची औषधे , झोपेचे सामाजिक महत्व आणि ड्रायविंग वरती होणारे परिणाम याविषयी जागृती करण्यात येते . World Sleep Day Committee जी की World Sleep Society या संघटने चा भाग आहे . या दिवसाचे आयोजन आणि नियोजन करते . योग्य माहिती आणि उपचाराविषयी योग्य ते ज्ञान यातुन झोपेच्या त्रासाचे प्रमाण कमी करणे हे या संघटनेचे मुख्य ध्येय आहे . मार्च महिन्यातील एका शुक्रवारी या दिवसाचे आयोजन केले जाते . तारीख बदलते पण दरवर्षी शुक्रवारीच हा दिवस साजरा केला जातो , त्या निम्मित्ता ने हा लेखन प्रपंच . *©Muktesh Daund*

पुढील लेखा मध्ये आपण झोपेच्या आजारांची माहिती घेऊ .
डॉ . मुक्तेश दौंड़ ,
मनोविकारतज्ञ ,
निम्स हॉस्पिटल , गंगापूररोड
, नाशिक
Mob No :9854019455

Scroll to Top